श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा)-श्रीरामपूर येथील तरूणाचा चोरीच्या उद्देशाने धारदार हत्याराने भोसकुन खुन करणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे श्रीरामपूर येथीलच आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०८/०७/२३ रोजी फिर्यादी नवनाथ दादासाहेब चौधरी, वय-४१, रा. भैरवनाथ नगर, गोंधवणी, ता. श्रीरामपूर यांचा मृत भाचा सुधीर अशोक कांदे, वय ३५, रा.गोंधवणी, ता.श्रीरामपूर याची धारदार हत्याराने भोसकुन हत्या करण्यात आली होती.सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन राहाता पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. ३५६ / २०२३ भादविक ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे
पो.नि.दिनेश आहेर यांना खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि.हेमंत थोरात,पोहेकाँ.दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, विजय वेटेकर, देवेंद्र शेलार, पोना.रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, पोकॉ.मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून तापसाबाबत सुचना केल्या.त्याप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन संशयीत मयूर विजय काळे वय २१, रा. रेणुकानगर सुतगिरणी, ता. श्रीरामपूर व किरण सुरेश काकफळे वय-२४, रा. रमानगर, सुतगिरणी, ता.श्रीरामपूर या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांना पोलीसी खाक्या दाखवतानंतर त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी मयत इसम रस्त्याने पायी जाताना आम्ही त्यास लिफ्ट देण्याचा बहाण्याने मोटारसायकलवर बसवुन निर्जनस्थळी नेवुन लुटण्याचे उद्देशाने चाकुने भोसकून जिवे ठार मारत त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना राहाता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन करीता आहे.



