spot_img
spot_img

प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न.

लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये आठव्या आंतरसदनीय वार्षिक क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत पेशवा सदनाने प्रथम क्रमांक मिळवून वार्षिक क्रीडा करंडक पटकावला.अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक रवींद्र भणगे यांनी दिली. 

यावेळी कार्यक्रमास संस्थेच्या कृषि संचालिका डॉ. शुभांगी सोळुंके यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी पेशवा, मोरया , छत्रपती, महाराणा यांच्या सुंदर संचलनाने क्रीडा ध्वजाला मानवंदना दिली.तीन दिवस सुरू असलेल्या असलेल्या कार्यक्रमाची सांगता पारितोषिक वितरण करून झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी डॉ. अविनाश डोळे प्रास्ताविक डॉ रोझमीन बेलीम यांनी क्रीडा मार्गदर्शन केले. सदर दिवशी झालेल्या आंतरसदनीय क्रीडा स्पर्धा पेशवा सदन मोरया सदन महाराणा सदन छत्रपती सदन या चार सदनांमधून व १२,१४, व १७ या वयोगटात घेण्यात आल्या.अतिशय चुरशीच्या झालेल्या या वार्षिक क्रीडा स्पर्धेत पेशवा सदनाने प्रथम क्रमांक* पटकावला . समारंभाचे प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना सुवर्णपदक ,रजतपदक, कास्यपदक देण्यात आली. यावर्षीचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार राहुल बोराडे व पूजा नागवे यांना देण्यात आला. सतरा वर्ष वयोगटात आदित्य पांढरे व दीक्षा गावित, चौदा वर्षे वयोगटात पराग दास व स्वरा शेलकरा, बारा वर्षे वयोगटात आदित्य वानखडे व उन्नती शिंदे यांना उत्कृष्ट खेळाडू चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. अविनाश डोळे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे व व्यायामाचे महत्त्व विशद केले.कठोर परिश्रम, प्रयत्नात सातत्य,चिकाटी व जिद्द ही यशाची त्रिसूत्री त्यांनी सांगितली.

हारणे व जिंकणे हा खेळाचा एक भाग आहे,असे ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात सर्व क्रीडा प्रकारात भाग घेऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, असा मूलमंत्र त्यांनी दिला. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षिक पी.के. गागरे पी. के. हॉस्टेल समन्वयक सनातना राऊत उपस्थित होते. क्रीडा संचालक रवींद्र भणगे, किरण कडसकर , अनिल शिकलकर,कु. प्रतीक्षा देवरे यांचे अनमोल सहकार्य लाभले. सदर क्रीडा स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ. कविता जोशी , जोसेफ, उदयनराजे मोहिते यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!