spot_img
spot_img

संसदेत पहिल्या टर्मच्या उत्कृष्ठ खासदारांमध्ये .डॉ.सुजय विखे पाटील

नवी दिल्ली ( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकसभेत गेल्या चार वर्षांत पहिल्याच टर्म मध्ये निवडून आलेल्या 
खासदारांनी आतापर्यंतच्या 11 सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकाच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेवून काही मुद्द्यावर हस्तक्षेप करून जनते प्रती आपली भूमिका ठाम मांडली यात अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा सक्रिय सहभाग राहिला असून त्यांनी 496 हस्तक्षेप आणि हरकतीचे मुद्दे मांडले. 
 या लोकसभेत तरुण खासदारांनी हिरेरीने सहभाग घेतल्याचे एक अहवालात स्पष्ट झाल्या नंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या दहा खासदारांचे विशेष कौतुक केले आहे. 
या दहा उत्कृष्ट खासदारांमध्ये डॉ.सुजय विखे पाटील यांचा समावेश असून पहिल्याच टर्म मध्ये केवळ विकास कामे यावर भर न देता देशाच्या विविध कल्याणकारी योजनाच्या अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी या बाबतच्या चर्चेत सहभाग घेवून काही हरकतीचे मुद्दे स्पष्ट सभागृहात मांडले. याचा परिणाम असा झाला की त्या त्या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या सूचना विभागास देण्यात आल्या.
     
2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह इतर ही काही सत्रांमध्ये या खासदारांनी सूचीबद्ध केलेले अनेक प्रश्न हे सभागृहात चर्चेला आली आणि याची उत्तरे मंत्र्यांनी सभागृहात दिली.
दरम्यान नवोदित खासदारांना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले असून अशाच पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडण्याचा सल्ला दिला. 
  देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी लोकसभेत विविध चर्चे दरम्यान आम्ही घेतलेल्या सहभागा बद्दल कौतुक केले असून आम्ही मांडलेले मुद्दे आणि हरकती या देखील त्यांनी पटलावर घेवून त्या त्या नुसार सुधारणा करण्याच्या सूचना केल्या हे आमच्या सारख्या पहिल्या टर्मच्या खासदारांसाठी नक्कीच कौतुकाची थाप मिळाल्या सारखं आहे….!
*डॉ.सुजय विखे पाटील*
खासदार अहमदनगर (द.)
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!