परळी (जनता आवाज वृत्तसेवा ):- गेल्या दहा दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत बदली आहे. याचे कारण असे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दुभागली गेली.
राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना फोनवरून धमकी व पन्नास लाख रुपयांची मागणी
राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. एक अजित पवार गट व दुसरा शरद पवार गट निर्माण झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे गट व भाजपबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यांच्याबरोबर इतर आठ आमदारांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा सत्ता संघर्ष पाहाण्यास मिळाला आहे. अजित पवार गटातील दोन मंत्र्यांना धमकीचे फोन आले. त्यातील एक मंत्री श्री छगन भुजबळ यांना धमकी देणारा अटक केली आहे.
आज दुसरे मंत्री श्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील परळी या गावाच्या निवासस्थानी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने धमकी देत त्याचबरोबर 50 लाख रुपयांची मागणी देखील केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांचे निवासस्थानी आलेल्या फोनची व धमकी देणाऱ्या व्यक्तीची पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यांना अद्यापही कुठलाही सुगाव लागलेला नाही.
सध्या महाराष्ट्राचे राजकारणाची परिस्थिती ही अतिशय बिकट बनली असून अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांमुळे महाराष्ट्राचे बिहार होते की काय? अशी परिस्थिती उद्भवली असून आता महाराष्ट्राचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून लवकरात लवकर याप्रकरणी निकालात काढावे हीच अपेक्षा महाराष्ट्राची जनता करत आहे



