श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- आईसाहेब व आदिक साहेब यांच्या वाटेवरच आम्हा बहीणभावाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले .
निपाणी वडगाव येथील रामराव आदिक पब्लिक स्कूल , येथे जानकीबाई वामनराव आदिक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याच्या पुतळ्यास हार घालून अभिवादननंतर अविनाश आदिक बोलत होते यावेळी जयंत चौधरी, हंसराज आदिक, सुनील थोरात, कैलास बोर्डे ,बापूसाहेब पटारे, रामराव औताडे, वसंतराव पवार भागचंद औताडे, सि वाय पवार, उत्तमराव पवार ,देविदास कोकणे,जयकर मगर,प्रभाकर पवार, आवटी सर, जगताप सर, प्रशांत खंडागळे ,ऋषिकेश डावखर, सुरेशराव देवकर साहेब, हर्षल दांगट, डॉ.वसंतराव देवकर ,भास्करराव ताके, माने सर ,सुधाकर आडांगळे सुधाकर बोंबले, बी वाय पवार आदि उपस्थित होते.
अविनाश आदिक म्हणले, आईसाहेब व साहेबांनी यांनीच आमच्यावर चांगले संस्कार टाकले लहानपणापासूनच घरात राजकीय वर्दळ असायची यातूनच आपण समाजात कसे वावरायचे यांची संस्कार घरातच मिळाले . घरातून मिळालेल्या संस्कारातूनच आपली राजकीय वाटचाल सुरू असल्याचे अविनाश आदिक यांनी सांगितले.



