spot_img
spot_img

रोझलँड स्कूलमध्ये गरबा,दांडिया रास आणि खेळ पैठणीचा उत्साहात संपन्न

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):-नेवासा फाटा येथील नामांकित रोझलँड सी.बी.एस. ई. स्कूलमध्ये नवरात्रीनिमित्त महिला पालकांसाठी गरबा, दांडिया आणि खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला. यामध्ये सर्व महिला पालकांनी गुजराती आणि राजस्थानी पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन गरबा आणि दांडिया चा आनंद घेतला.

तसेच यामध्ये महिलांसाठी विविध खेळ ठेवण्यात आले होते, सर्व महिला पालकांनी आपले कौशल्य पणाला लावून या खेळामध्ये सहभाग घेतला. यावेळी मनोगत व्यक्त करताना महिला पालक म्हणाल्या की, आज रोजलँड स्कूलने आम्हा महिलांना रोजच्या चाकोरी बद्ध जीवनातून बाहेर विरंगुळ म्हणून हा कार्यक्रम आयोजित करून आम्हा महिलांच्या सुप्त गुणांना वाव दिला.

यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. निकिता दीपक अंबाडे,आणि सौ रुपाली अजित अंबाडे तसेच प्राचार्य श्री सुनीलकुमार जैन उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!