श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ):- शालेय विभागीय पातळीवरील धनुर्विद्या स्पर्धा आज दि.१८-१०-२०२३ रोजी (अरण, ता. माढा ) सोलापूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव चा गुणवंत विद्यार्थी ऋतुपर्ण अमोल साळवे इयत्ता सातवीत शिकत असून 14 वर्ष वयोगटात रिकर्व्ह प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन केले.
विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरात त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
न्यु इंग्लिश स्कूल मढेवडगाव शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऋतुपर्ण म्हणाला नियमित व्यायाम, सराव केल्यामुळे यश मिळाले. राज्य स्तरीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून पदक मिळवण्याचा निर्धार ऋतुपर्ण ने केला आहे. ग्रामीण भागातून धनुर्धर खेळाडू तयार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. ग्रामीण भागातील खेळाडूची आजपर्यंत त्याची वाटचाल खूपच प्रेरणादायी आहे. तो वयाच्या सातव्या वर्षापासून जिद्द ,चिकाटी अथक परिश्रम घेऊन घरासमोरील उपलब्ध जागेत सराव करत आहे. यापुढील काळातही तो अधिक कष्ट करणार आहे. त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री अभिजित दळवी आणि डॉ शुभांगी दळवी मॅडम यांचे मार्गदर्शन मिळत आहे. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एच .के.दांगडे म्हणाले ऋतुपर्ण हा विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळवून विद्यालयाचे आणि रयत शिक्षण संस्थेचे नाव मोठे करेल असा विश्वास व्यक्त केला.व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. श्री संजय पानसरे मुख्याध्यापक -वांगी ता. करमाळा यांनी रोख पारितोषिक दिले. शाळेचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थींनी, मुख्याध्यापक श्री. दांगडे एच के, पर्यवेक्षक श्री. सुलाखे व्ही.बी,अरुण पवार ,रामदास. पवार, राजेंद्रशेळके . संतोष भोईटे ,शंकर यदलोड , प्रशांत काळुखे , प्रणव नलगे ,अंकुश कोकाटे ,मंगेश गांगोडे, भगवान दिघे , विठ्ठल लेंडे , मनीषा कदम अर्चना कोरडे ,सुमती सुरसे , महादेवी माने , महालक्ष्मी बोलणे गोडगे मॅडम ,बाबासाहेब शिरोळे, गणेश इंगळे यांनी अभिनंदन केले .तसेच स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन कमिटी या सर्वांनी पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



