माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा): – श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे सालाबाद प्रमाणे साई चरित्र पारायण सोहळ्याच्या सातव्या दिवसाची जागर कीर्तन सेवेची सुरवात आई जगदंबा मातेला , गो मातेला , भारत मातेला वंदन करून ह भ प महंत प्रकाशनंदगिरीजी महाराज यांनी केली.
त्या वेळी ते बोलत असताना म्हणाले की देवगड च्या बाबांची भक्ती निर्मल आहे त्यात शुद्ध भाव आहे आणी ज्याची भक्ती निर्मल असते ज्याचा भाव शुद्ध असतो तो भक्त ही भगवंताला आवडतो म्हणून शुद्ध भावाने भक्ती करावी. ज्या वेळी राम मंदिर बांधण्याचा निर्णय झाला त्या मंदिराच्या भूमीपूजनाला त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून साधूसंतांतून केवळ आणी केवळ देवगडच्या बाबांना च निमंत्रित करण्यात आले याला म्हणतात भगवंताने भक्ताच्या भक्तीची , सेवेची घेतलेली दखल आपण परम भाग्यवान मंडळी आहोत कारण आपण संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय, संत सद्गुरू देवगडचे बाबा अशा महान आणि पावन संतांनी जन्म घेतलेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभला म्हणून आपण सर्व पर्मभाग्यवान आहोत.
यावेळी , युवा नेते सिद्धार्त पोलीस पाटील संजय आदिक (माळवाडगाव),पोलीस पाटील,मधुकर बनसोडे (भामठाण) , जेष्ट पत्रकार भाऊसाहेब मामा काळे, सर्व पत्रकार बंधू, सर्व भजनी मंडळी , वादक,गायक, सर्व साई चरित्र पारायण कमिटी, समस्त ग्रामस्थ माळवाडगाव, व पंचक्रोशीतील भक्ती मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर दादा बनसोडे ( भामाठाण ) यांनी सूंदर अशा जेवणाची व्यवस्था केली होती.



