एकरुखे ( जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील एकरुखे येथील जागृत देवस्थान माता वज्रेश्वरीचा अष्टमीचा होम पेटविण्यासाठी पश्चिम बंगाल कालिकामाता या ठिकाणाहून मशाल ज्योत वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या वतिने आणण्यात आली या मशाल ज्योतचे राहात्यासह परिसरात मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
एकरुखे गावचे आराध्य दैवत असलेल्या माता वज्रेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे. या काळातील आठव्या माळेला गावात अष्टमीला होमहवन प्रज्वलित होण्याची पारंपरिक परंपरा आहे. या होमहवनच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त गर्दी करतात याच अनुषंगानेच , गावातील वज्रेश्वरी प्रतिष्ठाण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक देवेंद्र भवर याच्या मार्गदर्शना खाली सत्तर ते ऐंशी युवक पायी प्रवास करत भारत देश व देशाबाहेरील शक्ति पिठावरून मशाल ज्योत आणण्याचा स्तुत्य उपक्रम गत एकोणाविस वर्षांपासुन राबवित आहे.
या वेळी पश्चिम बंगाल येथील कालिका माता या ठिकाणाहून पायी मशाल ज्योत आणण्यात आली या विषयी देवेंद्र भवर यांनी बोलतांना सांगितले की, घाटमाथ्याचा खडतर प्रवास करत माता वज्रेश्वरीच्या महिमेच्या जागरासह एकरूखे परिसरातील माता वज्रेश्वरीच्या भाविकांच्या भक्तांच्या जोरावर ही ज्योत आम्ही आणत आसुन या जागृत देवस्थानाच्या होम प्रज्वलीत करण्यासाठी आमच्या युवकांसाठी भुषणावाह बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या ज्योतचे आगमन शहरात होताच अनेक भाविक भक्तांनी मशाल ज्योतीचे औक्षंण करत विधिवत पुजा केली, राहाता ते एकरूखे सवाद्य निफाड येथील प्रसिद्ध बॅन्ड सह मिरवणूक काढण्यात आली होती. या पायी ज्योत सोहळ्यात सहभागी असणाऱ्या युवकाची पाद्य पुजा करण्यात आली,
मिरवणुकीसाठी रस्त्यालगत दुतर्फा उपस्थित भाविक भक्त व एकरूखे ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती,सनई चौघाडा च्या सुरात व हळदीची उदळण करत आईच्या जय घोषात अनेक युवकानी नांचण्याचा आनंद लुटला, पावलोपावली झालेल्या स्वागतानी प्रतिष्ठाणचे सभासद भारावून गेले दुपारच्या सुमारास, एकरूखे येथे ज्योतीचे आगमन झाले ,
माजी जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते मशाल ज्योतीचे स्वागत करण्यात आले, यावेळी विखे पाटील यानी राबवित असलेल्या उपक्रम बद्दल प्रतिष्ठान चे कौतुक करत भावी वाट चालीस शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. श्रीराम व वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट कडून प्रतिष्ठाणच्या सभासदाचा सत्कार समारंभ करण्यात आला, आणलेल्या मशाल ज्योत च्या आधारे मंदिराच्या प्रांगणातील होम विधीवत पुजा करत आणलेल्या मशाल ज्योतीच्या साह्याने प्रज्वलित करण्यात आला, यावेळी भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माता वज्रेश्वरीचा होम प्रज्वलीत करण्यासाठी पश्चिम बंगाल कालिकामाता येथुन पायी मशाल ज्योतिचे स्वागत करतांना उपस्थित जनसमुदाय.



