कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री भगवतीमाता देवालय ट्रस्ट व स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचनास महिलांकडून उस्फुर्त व उदंड प्रतिसाद मिळत आहे. समुदायीक पाठ वाचनाचे हे सलग १२ वे वर्ष असून ६०० महिलांनी सहभाग नोंदवला आहे.
श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूरमध्ये सध्या नवरात्र महोत्सव सुरू आहे. दिवसेंदिवस आदिशक्ती उपासक व भक्तांनी मंदिर परिसर गर्दीने फुल्ल होत आहे. देवालय ट्रस्टकडून केलेल्या उत्तम नियोजनामुळे भक्तांचा मातेचे सुलभ दर्शन होत आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री स्वामी समर्थ सेवेकरी वर्गाने सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचनाचे सुयोग्य नियोजन केले आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत हे पाठ वाचन मंदिरातील भक्तनिवास समोर सुरू आहे. समर्पण ध्यान सेंटरच्या महाराष्ट्र प्रभारी प्रियंकाताई खराडकर यांनी यावेळी दुर्गा सप्तशती, नवरात्र, यासाठी सर्वश्री विजय कुंडली शक्ती व आई साहेबांचे महत्व विशद केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय डेंगळे, विजय खर्डे, गणेश सोमवंशी,विकी पाटोळे व सर्व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत.
मोफत आरोग्य तपासणी..
प.पूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल व मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण व सर्वरोग निदान शिबीर शुक्रवारी आयोजित केले होते. या शिबिराचा शेकडोंनी लाभ घेतला.



