spot_img
spot_img

शिक्षणाच्या सुविधा असलेल्या भागात *वसतिगृह व आश्रमशाळेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील* *हसनापूर येथे आदिवासी वसतिगृहाचे भूमिपूजन*

शिर्डी, दि.९ जूलै ( जनता आवाज वृत्तसेवा) – शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या भागात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या एकत्रित प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली .

एकात्मिक आदिवासी प्रकल्पा अंतर्गत हसनापूर येथे सुमारे १३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, प्रकल्प अधिकारी राजन पाटी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती एस.बी.गाडेकर सरपंच सौ.छाया बारसे, प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे,चेअरमन अशोकराव धावणे, आब्बास पटेल दादासाहेब घोगरे, सरपंच सौ.पूनम बर्डे, बाजार समितीचे संचालक राहूल धावणे ,उपसरपंच गणेश विखे अनिल विखे, वकील संघाचे अध्यक्ष नितीन विखे आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, यापूर्वी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे झालेले काम सर्वासाठी रोल माॅडेल ठरले आहे. या इमारतीचा मास्टर प्लॅन राज्यातील इतर वसतिगृहाच्या इमारतीसाठी उपयुक्त ठरला आहे. नव्याने विकसित होत असलेली इमारत सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्याचा सूचनाही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.
राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांकरिता महत्त्वपूर्ण निर्णय करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. संशोधनात्मक शिक्षणासाठी शिष्यवृती योजना सुरू केली.‌उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी येत असल्याने वसतिगृहाच्या इमारती अद्यावत आणि सर्व सुविधांनी परीपूर्ण असाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
राज्यातील आदिवासी विभागात सुविधा उपलब्ध होत असल्याने या भागातील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत असलेल्या निर्णयाची माहिती समाजातील युवकांनी जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
खा.सदाशिव लोखंडे यांनी लोणी येथे मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या कामाचे कौतुक करून आशा इमारती आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांकरीता उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!