spot_img
spot_img

वय झाले ते खरे आहे पण गडी काय आहे अजून पहिला कुठे – शरद पवार

येवला (जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर पहिल्यांदा शरद पवार यांनी येवल्यात जनसभा घेतली. सभेच्या वेळी प्रचंड जन समुदाय होता. त्याआधी ते मुंबई, ठाणे, घोटी, इगतपुरी, मार्गे नाशिकला आले. त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत झाले.

 नाशिक मार्गे येवल्याला त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी तिथे प्रचंड जनसमुदायनी  शरद पवार यांना पाहून मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत केले. शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की काही वक्ते आत्ताच त्यांच्या भाषणात सांगत होते की, पवार साहेबांनी जे नाव दिले त्यांना येवल्यातील लोकांनी निवडून दिले. कारण  जनतेला माहीत होते की, मी कधी नाव चुकेल असे ते म्हणाले. पण माझ्याकडून एका नावाची चुकी झाली. त्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. मी कोणावरही ठिका न करता मी जनतेची माफी मागण्यासाठी आलोय कारण माझा अंदाज फारसा चुकत नाही. परंतु येथे माझा अंदाज चुकलाय त्यामुळे मी यापुढे चुकणार नाही असे ते म्हणाले.

 शरद पवार सभेत पुढे बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ विषयी माझा अंदाज चुकलाय असे ते येवलेतील जनतेला म्हणाले. व्यक्तिगत बोलणे कधी थांबत नसते यावर ते म्हणाले की वय झाले ते खरे आहे पण गडी काय आहे अजून पहिला कुठे असे बोलताना त्यांनी एक प्रकारचा बंडखोरांना इशारा दिला आहे. त्यामुळे उगाच वयाच्या भानगडीत पडू नका, वय आणि व्यक्तिगत भावना आम्हाला कोणी शिकू नये. व्यक्तिगत हल्ले अजिबात कुणावर झालेले नाही. आणि त्यांनीही पण करू नये  असे ते म्हणाले.
शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली, ते म्हणाले १० ते १२ दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये एक दोन उदाहरण सांगितली. भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनी जे आरोप केले असतील त्या भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा आणखीन काय असतील त्यावर त्यांनी कारवाई करावी. ते म्हणाले की पण देशाच्या पंतप्रधान यांना माझे जाहीर सांगणे आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी असेल असं तुम्हाला वाटत असेल त्याची तुम्ही चौकशी करावी. आणि त्याला तुम्ही शिक्षा द्यावी. यासाठी माझा तुम्हाला सदैव पाठिंबा असेल.
 या सभेच्या वेळी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अमोल कोल्हे, माजी आमदार मारुतीराव पवार, कल्याण काळे, कोंडाजी मामा आव्हाड, अंबादास बनकर याचबरोबर हेमंत टकले, श्रीराम शेटे, गजानन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!