spot_img
spot_img

सागर दादा तनपुरे यांना “सहकार समृद्ध” पुरस्काराने सन्मानित

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी तालुक्यात मनाचा तुरा उभरणारी केशर मल्टीस्टेट संस्था असून बजरंग गंगाधर तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादित केले या संस्थेने अनेक गोर गरीबची रोटी साठी मोठे योगदान आहे त्याचेच फळ म्हणून या संस्थेचे चेरमन सागर दादा तनपुरे यांना “सहकार समृध्द “पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सहकार क्षेत्रामध्ये अलौकिक कार्य करणाऱ्या संस्थांचा नगर जिल्हा स्थैर्यनिधी सहकार संघाच्यावतीने पुरस्कार देत सन्मान करण्यात आला हा पुरस्कार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम अहमदनगर जिल्हा निधीच्यावतीने आयोजित शिर्डी येथील पुरस्कार सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विखे यांसह बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, सहकाय आयुक्त अनिल कवडे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्य निधीचे सुरेश वाबळे, वसंत लोढा, साई आदर्श मल्टिस्टेटचे संस्थापक शिवाजी आप्पा कपाळे आदींच्या उपस्थितीत केशरबाई पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

माननीय कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सागर तनपुरे यांना सहकार समृद्ध युवा पुरस्कार देण्यात आला. यावेळी संस्थेचे अॅड. जालिंदर ताकटे, गणेश देशमुख, गणेश पवार, शिवाजी वराळे, प्रकाश तनपुरे, तुषार काळे, दादासाहेब ठोकळे, तुळशिराम तनपुरे, विजय उंडे, संस्थेच्या सचिव कांचन पानसंबळ, सिद्धार्थ मुसमाडे, स्वप्निल तनपुरे, रियाज शेख, गौरव खाडे, देविदास कोरडे, प्रशांत शेळके, रमण वरशिंदकर, दादासाहेब शिरसाठ, गणेश तारडे, गणेश वराळे आदीं पुरस्कार दरम्यान उपस्थित होते.

यावेळी सागर दादा तनपुरे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर स्वर्गीय सोमनाथ तनपुरे यांच्या मार्गदर्शनात केशरबाई तनपुरे पतसंस्था व मल्टिस्टेट संस्थेची वाटचाल अशीच विकासात्मक सुरू राहणार असल्याचे सांगितले.केशरबाई तनपुरे पतसंस्थेने ८५ कोटीचा ठेवीचा आकडा शतकपूर्ती पार करील स्व. कैलासदादा तनपुरेंचा आदर्श घेत उद्योजक सागर तनपुरे यांनी सर्व क्षेत्रात यश संपादित केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!