या विषयी माहीती देतांना या विभागाचे प्रमुख डाॅ.संजय कुरकुटे म्हणाले, सहभागी स्पर्धकांची तज्ञ निवड समितीच्या माध्यमातून निवड करण्यात येणार असून सलग्न इंक्युबेटरमध्ये प्रोटोटाईप स्टेजवरील नवउद्योजकांना इनक्युबेशन प्रोग्रामकरिता निवड आणि आर्थिकसहाय्य करण्यात येणार आहे.
एमएसएमई मंत्रालयातर्फे आयडियाहॅकॅथॉन ३.० चे आयोजन११ जुलै पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत
लोणी दि.८( जनता आवाज
वृत्तसेवा ):-सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने एमएसएमई आयडिया हॅकॅथॉन ३.०ची घोषणा करण्यात आली आहे.एमएसएमई आयडिया हॅकाथॉन ३.०स्पर्धेमध्ये महिला विद्यार्थी, महिला स्टार्टअप आणि महिला एमएसएमई यांच्याकडून समस्या सोडवण्याकरिता ११ जुलै पर्यंत नाविन्यपूर्ण कल्पना मागविण्यात आल्या आहे. प्रवरा ग्रामीण अभियांञिकी महाविद्यालय लोणी येथे सलंग्न इंक्युबेटरच्या माध्यमातून या हॅकॅथॉनमध्ये सहभाग नोंदविता येऊ शकेल. अशी माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.
लघु आणि मध्यम उद्योग आणि
भारतातील महिलांना नागरिकांना स्थानिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधतांना नाविन्यपूर्ण उपाय तयार करता यावेत असा सूक्ष्म, लघु आणि मध्यम
उद्योग मंत्रालयाचा हा प्रयत्न आहे.
एमएसएमई इनोव्हेटिव्ह हा एक समग्र
दृष्टीकोन असून, तीन उपघटक
आणि उपाययोजना एकत्र करून
त्यात समन्वय साधणे हा उद्देश
आहे. एमएसएमई इनोव्हेटिव्ह ही
एमएसएमईसाठी एक नवीन संकल्पना
आहे. यामध्ये इनक्युबेशन, डिझाइन
इंटरव्हेन्शन आणि आयपीआरचे
संरक्षण करून एमएसएमईना
भारतातील नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल
जागरूकता निर्माण करण्यात येणार
आहे. निवडण्यात येणाऱ्या स्टार्टअॅपना
होस्ट इंस्टीट्युटच्या माध्यमातून
एमएसएमई मंत्रालयातर्फे प्रत्येकी १५
लाख रुपयापर्यंत अनुदान (सीड फंड)
देण्यात येईल.महिला विद्यार्थीनी, महिला नवउद्योजक आणि महिला
एमएसएमईनी अधिक माहितीसाठी
आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी
https://my.msme.gov.in/inc/Hackathon_Reg.aspx
संकेतस्थळाला भेट द्यावी, आणि
योजनांचा जास्तीत जास्त फायदा
घ्यावा, असे आवाहन डॉ. संजय एल कुरकुटे , डॉ. एस बी मगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.यासाठी
9850138917, 9822813652 या भ्रमणध्वनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.



