लोणी दि.२३( जनता आवाज वृत्तसेवा ):-ग्रामीण भागामध्ये काही पिके त्यावर आधारित पशुपक्षी पालन छोटे-मोठे व्यवसाय अशी एकमेकांमध्ये गुंतलेली एकमेकांवर अवलंबून एकमेकांशी जोडलेली संरचना निर्माण झालेली असते. याच एकात्मिक शेती पद्धतीचे एक उत्तम उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील नांदूर बुद्रुक गावात पाहायला मिळते.तालुक्यातील नांदूर येथील अनिल भाऊसाहेब भदे यांनी एकात्मिक शेती पद्धतीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वडिलोपार्जित शेतीमध्ये सुधारणा करून त्यांनी शेतीसोबत पशुपालन कुक्कुटपालन मत्स्यपालन आणि काही प्रमाणात फळबाग यांची सांगड घातली आहे. या प्रत्येक घटकातून तयार होणारे टाकाऊ सेंद्रिय घटक योग्य प्रक्रिया नंतर पुन्हा शेतीमध्ये वापरले जाते. पशुपालना मधून निघणारे टाकाऊ सेंद्रिय घटक हे बायोगॅस निर्मितीमध्ये वापरले जाते तसेच बायोगॅस निर्मितीनंतर स्लरीचा वापर हा शेतीमध्ये केला जातो. तसेच कुकूटपालना मधून निघणारी विष्ठा व टाकाऊ पदार्थ यांचा वापर मत्स्यपालनात खाद्य म्हणून केला जातो. शेतीमध्ये मिश्र पीक आंतरपीक पद्धतीमध्ये शास्त्रीय बदल करणे सापळा पिके सजीव कुंपणे यांचा समावेश केला आहे.
कोणतेही कृषीचे शिक्षण नसताना अनिल भाऊसाहेब भधे यांनी करून दाखवले आहे. आजच्या युवा पिढीसमोर एकात्मिक शेती पद्धतीचे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.एकत्रित कुटुंब पद्धती व एकात्मिक शेती या दोन मुख्य बाबी शेतीला प्रगत करण्यास मोठी कामगिरी बजावतात अनिल भदे यांची शेती सुमारे पाच एकरावर आर्थिक पकड घट्ट केली आहे. पाच एकर या वडिलोपार्जित शेतीमध्ये अद्रकच्या पिकात सातत्य ठेवले आहे तसेच त्यांचा हातखंड तयार झाला आहे. अहमदनगर येथील बाजारपेठेत विक्री करण्याबरोबरच थेट विक्रीचे तंत्रही आत्मसात करीत त्यांनी या पिकावरील नफा वाढवला आहे.
सुरू झाली आद्रक लागवड………
नांदूर शिवाराला प्रवरा प्रकल्पाचे पाणी मिळते त्यामुळे हा भाग कायम बागायती पिकांचा भाग राहिला आहे. अद्रक ऊस सोयबीन ही मुख्य पिके आहेत अनेक शेतकरी हंगामी फळबागांची लागवड करतात यात टरबूज डाळिंब यांचा समावेश आहे काही शेतकरी भाजीपाला पिके घेतात. नांदूर शिवारात पाच वर्षांपूर्वी काही मोजके शेतकरी अद्रक लागवड करत असे.शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून अद्रक शेती व त्याचे अर्थकारण जाणून घेतले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पिकाकडे वळण्याचा विचार केला. त्यांचा हळूहळू वर्ष गाणी या पिकावरील अनुभव वाढू लागला व बाजारपेठ कळू लागली.
२०१४ मध्ये अद्रक लागवडीला सुरुवात केली तेव्हा त्यांनी दोन एकरामध्ये अद्रक लागवड केली. तेव्हा त्यांना पाच लाखाचे उत्पन्न भेटले. आता त्यांना सहा लाख रुपयांचे उत्पन्न भेटले. २०२३ मध्ये त्यांनी अडीच एकरामध्ये एकरामध्ये अद्रक लागवड केली व त्यातून त्यांना सात आठ लाख रुपये भेटले.
कुक्कुट पालनाची सुरुवात………..
अद्रक पिकानंतर अनिल भदे यांनी कुक्कुटपालना बद्दल विचार केला.त्यांनी आधी कुकुट पालना बद्दल माहिती गोळा केली व मार्गदर्शनाखाली त्यांनी कुक्कुटपालनाची सुरुवात केली. २०२० मध्ये त्यांनी ९ गुंठ्यान मध्ये कुकुट पालन सुरू केलं. तेव्हा त्यांच्याकडे २०००० पक्षी होते व ते ५० दिवसांमध्ये तयार होते. तेव्हा त्यांना कुक्कुटपालना तीन लाखाचे उत्पन्न भेटले. व सध्या त्यांच्याकडे आत्ता पक्षी येत आहेत.
मत्स्य पालनाची सुरुवात………..
अनिल भदे यांनी मत्स्य पालना बद्दल विचार केला त्यासाठी त्यांनी माहिती गोळा केली व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मत्स्य पालना ची सुरुवात केली ऑक्टोंबर २०२३ मध्ये त्यांनी मत्स्य पालन सुरू केले. त्यांनी अर्धा एकरात शेततळ्यामध्ये रवास माशाचे पालन करत आहेत. त्यांच्याकडे २५००० रावस मासे आहेत.
सेंद्रिय घटकांचा वापर…………
अनिल भदे यांनी सेंद्रिय घटकांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केल्या आहे त्यांनी पशुपालनातून निघालेले घटक हे बायोगॅस निर्मितीमध्ये वापरले जाते तसेच बायोगॅस निर्मितीनंतर स्लरीचा वापर हा शेतीमध्ये केला जातो. तसेच कुकूटपालना मधून निघणारी विष्ठा व टाकाऊ पदार्थ यांचा वापर मत्स्यपालनात खाद्य म्हणून केला जातो. शेतीमध्ये मिश्र पीक आंतरपीक पद्धतीमध्ये शास्त्रीय बदल करणे सापळा पिके सजीव कुंपणे यांचा समावेश केला आहे.
राहता तालुक्यातील नांदूर बुद्रुक येथील श्री अनिल भदे हे एक उत्तम एकात्मिक शेती पद्धतीचे एक आदर्श उदाहरण आहे.
राहाता तालुक्यातील नांदूर बुद्रुक येथे ग्रामीण जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धतीचे एक आदर्श उदाहरण सांगितले. यावेळी कृषीकन्या त्रिवेणी खर्डे, चेतना जाधव ,प्रतीक्षा नागवडे, दिशा भालेराव, तेजस भोंडवे या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धती कशी करावी या बद्दल माहिती सांगितली. कारा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय लोणी येथे या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक डॉ.रमेश जाधव, कार्यक्रमाधिकारी डॉ. विक्रम अनाप डॉ.दिपाली तांबे आणि डॉ.रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक शेती पद्धती बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत आहे.
महसूल मंञी ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रवरेच्या कृषि महाविद्यालये ही विद्यार्थ्याना कृषि शिक्षण देतांनाच आपल्या कार्यक्षेञात असलेल्या गावामध्ये शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शन करतात.कोविड काळात या महाविद्यालयाने केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकरी वर्गाला थेट मार्केटींग,प्रक्रिया,जैविक खते आणि औषधे याव्दारे मार्गदर्शन केले जाजे याशिवाय मंञी विखे पाटील यांच्या संकल्यनेतून तज्ञ आणि शेतकरी थेट बांधावर जावून मार्गदर्शन करतात यांचा चांगला फायदा शेतक-याना होत आहे.



