येवला (जनता आवाज वृत्तसेवा ):- छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेला येवला मतदार संघात शरद पवार यांची आज सायंकाळी चार वाजता पहिली जाहीर सभा होणार आहे.
छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेला येवला मतदारसंघात शरद पवार यांची आज जाहीर सभा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत आठ आमदारांनी भाजप शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापैकी येवल्याचे आमदार छगन भुजबळ हे पण आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जे बंड झाले या बंडाच्या विरोधात शरद पवार हे राज्यव्यापी दौरे सुरू करणार आहेत. राज्यव्यापी दौऱ्याची पहिली नारळ आज सायंकाळी चार वाजता येवला येथे फोडणार आहेत. तसे ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत असे सांगितले जाते. आज ही सभा येवला बाजार समितीच्या मैदानावर होणार आहे या सभेमध्ये पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार याकडे येवला कर व संपूर्ण महाराष्ट्र लक्ष देऊन आहेत.
या सभेचे नियोजन स्थानिक नेते श्री माणिकराव शिंदे व अन्य पदाधिकारी या सभेची जोरदार तयारी करत आहे.
शरद पवार यांना प्रत्युत्तर देण्यासाठी छगन भुजबळ हे देखील आज नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे येणारा काळामध्ये मोठा संघर्ष पाहण्यास मिळू शकतो.



