spot_img
spot_img

प्रवरा हायस्कूल कोल्हार मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव 

कोल्हार दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेमध्ये आज वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला.

शाळेचे माजी विद्यार्थी आणि एचडीएफसी बँकेचे सीनियर मॅनेजर अभिजीत ओहोळ प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धा आणि उपलब्ध होणाऱ्या संधी याबाबतची जाणीव जागृती व्हावी म्हणून विद्यालय दरवर्षी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करते . सन २०२३-२४ च्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या प्रमुख अतिथी म्हणून हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन चे सीनियर मॅनेजर अभिजीत ओहोळ यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा स्पर्धांचे जीवनातील महत्त्व विशद केले.कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग घेणे ही प्रथम पायरी असून स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवणे हा यशाकडे जाण्याचा मार्ग आहेअसे त्यांनी स्पष्ट केले.

प्रवरा विद्यार्थ्यांना नेहमी विविध क्षेत्रातील संधीसाठी प्रोत्साहित करीत असते .प्रवरेने मला घडविल्यानेच मी आज जीवनामध्ये यशस्वीपणे आव्हानांचा सामना करू शकतो .तुम्ही देखील विद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या विविध संधींचा यथायोग्य उपयोग करावा आणि आपल्या जीवनाचा मार्ग शोधावा .कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी पाहुण्यांचे ओळख करून देऊन प्रास्ताविक केले .स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक कदीर शेख यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष आहेर आणि टीव्ही ताबे यांनी केले तर आभार ऋतुजा भालके हिने मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस इ कडू , पी जे. काळे, ए. डी. म्हस्के, एस जी आहेर इत्यादींनी परिश्रम घेतले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!