नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषण/साखळी उपोषण/चक्री उपोषण सुरु करीत असले बाबत मराठा आरक्षण आंदोलन कृती समिती ने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आंतरवाली सराठी, जिल्हा जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. पुरेशी संधी देउनही सरकारने अदयाप त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र भर आंदोलन उभे करीत आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही नेवासा शहर व तालुक्यातील मराठा समाज व सदर मागणीला पाठिंबा देणारे इतर समाजातील नागरिक शनिवार दिनांक २८/१०/२०२३ रोजी आमरण उपोषण सुरु करणार आहोत. तसेच आमरण उपोषणा बरोबरच साखळी उपोषण, चक्री उपोषण, रस्ता रोको आदि मार्गाने पाठिंबा देणार आहोत. तरी सरकारने याबाबत गंभीर दखल घेउन आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सोडवावा असे निवेदनात म्हटले आहे.



