spot_img
spot_img

श्रीराम चौक मित्रमंडळाचे रावण दहन उत्साहात

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- गेल्या ५६ वर्षांपासून श्रीराम चौक मित्र मंडळाच्या वतीने रावण दहनाचे आयोजन केले जाते या मंडळाच्यावतीने रावणाच्या छातीवर लिहिलेले स्लोगन वर्षभरातील घडलेल्या राजकीय घडामोडींवर केलेली मार्मिक टिपणी असते. यावेळेच्या रावणाच्या छातीवर ‘आता हुलगेच’ हे स्लोगन श्रीरामपूरकरांना अनेक गोष्टीची जाणिव करुन देणारे ठरले आहे.

येथील बेलापूर रस्त्यालगत असलेल्या कालव्याजवळ रावणाचे दहन केले जाते. श्रीराम तरुण मंडळाच्या रावणाचे दहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये, अध्यक्ष सुरेश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, गौतम उपाध्ये यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रितेश कुंकूलोळ, राजेंद्र लचके, राजेंद्र उंडे , जयराम उपाध्ये, राजेद्र पाटणी, मिथुन पांडे, विशाल अंभोरे, सतिश शहाणे, दिनेश अंभोरे, राहुल उपाध्ये, अतुल उपाध्ये, सोमनाथ चापानेरकर, महेश उदावंत,बाळ उपाध्ये, आदी उपस्थित होते.

दस-याच्या दिवशी होणारे रावण दहन श्रीरामपूरकरांसाठी एक उत्सुकतेचा विषय असतो. त्याच्या छातीवर लिहिलेले स्लोगन वर्षभरातील घडलेल्या राजकीय घडामोडींवर केलेली मार्मिक टिपणी असते. श्रीराम तरूण मंडळाच्या रावणच्या छातीवर लिहिलेले ‘आता हुलगेच’ हे स्लोगन श्रीरामपूरकरांना अनेक गोष्टींची जाणिव करुन देणारे ठरले आहे.

श्रीराम तरुण मंडळाच्यावतीने शहरात सर्वात प्रथम देवी स्थापन करण्याचे ५६ वर्षेची परंपरा आहे. या मंडळाच्यावतीने वर्षेभर विविध कार्यक्रम आयोजीत केले जातात. शहरातील छोटे-मोठे व्यापारी दानशुर व्यक्ती यांच्या देणगीतुन शारदा उत्सव साजरा केला जातो. या मंडळाचे प्रमुख अशोक उपाध्ये यांनी सांगितले रामायण ,महाभारत ,विविध किर्तेने मंडळाच्यावतीने घेण्यात आलेली आहेत. यावेळी श्रीरामपूरकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावीत रावण दहनाचे क्षण मोबाईलमध्ये साठविला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!