मिरी (जनता आवाज
वृत्तसेवा ):- महाराष्ट्रामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत असल्याचे मत मिरीच्या सरपंच सुनंदा गवळी यांनी व्यक्त केले.
 पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील समाधान बचत गटास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डिले, पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे  यांच्या विशेष  प्रयत्नातून पिठाच्या गिरण्या, पॅकिंग मशीन मसाला गिरण्या वजन काटा आधी साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला यावेळी त्या बोलत होत्या.
 आज गावागावात महिलांनी बचत गटाचे जाळे निर्माण केले आहे यातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार तर मिळतोच शिवाय त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. बचतीचे महत्त्व समजल्याने प्रत्येक महिला बचत गटात सहभागी होत असल्याचेही गवळी यांनी यावेळी सांगितले. यावेळी बचत गटातील 20 महिलांना या साहित्याचे वाटप केले. यावेळी महादेव कुठे, सुभाष गवळी कारभारी गवळी,साहेबराव गवळी, नानासाहेब शिंदे, शुभम मोटे, राजू मामा तागड,संतोष शिंदे,अशोक झाडे, राजेंद्र गवळी, सिताराम भगत, मयूर तागड,  श्रीमती असणार, भाऊसाहेब उघडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बचत गटामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे.
 मिरीच्या सरपंच सौ सुनंदा गवळी यांनी बचत गटाच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य केले. त्यामुळे त्यांची सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.




