spot_img
spot_img

गुरुवर्य बन्सी महाराज तांबे यांच्या २९ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा):- संत श्री ज्ञानेश्वर महाराज “पैस” खांब मंदिराचे निर्माते वैकुंठवाशी गुरुवर्य हभप श्री बन्सी महाराज तांबे यांच्या २९ व्या पुण्यतिथी सोहळयाची तीर्थक्षेत्र नेवासेनगरीत जय्यत तयारी सुरू आहे.शुक्रवार दि.२७ ऑक्टोबर ते दि.३ नोव्हेंबर या कालावधीत हा सोहळा होत असून आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळयात पहाटे ४ ते ६ काकडा भजन व आरती,सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण,दुपारी ४ ते ५ प्रवचन,५ ते ६ हरिपाठ रात्री ७ ते ९ कीर्तन व नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ ते ५ यावेळेत होणाऱ्या प्रवचनामध्ये हभप नितीन महाराज हरकळ,अशोक महाराज बोरुडे दहीगावने, रामनाथ महाराज काळेगावकर, ऋषिकेश महाराज वाकचौरे ,हभप योगेश महाराज पवार ,गणेश महाराज आरगडे , सोमनाथ महाराज पाटील यांचा समावेश आहे.

रात्री ७ ते ९ यावेळेत होणाऱ्या कीर्तन महोत्सवात चंदिले नाना महाराज ,हभप देविदास महाराज म्हस्के ,हभप हरिशरण महाराज ,हभप केशव महाराज उखळीकर, हभप योगेश महाराज गोसावी , डॉ.शुभम महाराज कांडेकर,मीराबाई महाराज मिरीकर यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या सकाळी ९ ते ११ यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने पुण्यतिथी सोहळयाची सांगता होणार असून भाविकांनी गुरुवर्य बन्सी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने होणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा तसेच प्रवचन कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!