राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा) :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील जागृतदेव स्थान बिरोबा महाराज यांचा व्हईक (भाकीत) चा यात्रा उत्साहात भक्तीमय वातावरणात पार पडला.
श्री क्षेत्र पुणतांबा येथुन गंगाजल आणलेल्या कावड भक्ताची भंडाऱ्याची उधलण करीत गावातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली गंगाजलाने बिरोबा महाराजाना जलाभिषेक घालण्यात आला. सकाळी ११ वाजता जिल्हयाच्या कानाकोपर्यातुन आलेल्या भाविक भक्तानी वाण वह्याचा कार्यक्रम सादर केला.खोकर भोकर ,राहुरी,कुरणवाडी, तांदूळवाडी, बाभुळगाव,आरडगाव,मिरी,वडुले खु ,ब्राम्हणी, केंदळ,वाबोरी भाविकानी वाण वह्याच्या कार्याक्रमासाठी हजेरी लावली.
डिग्रस येथील बिरोबा महाराजाचे भक्त रमेश गावडे महाराज यांनी चालु वषाचे भाकीत सांगताना पाढऱ सोन्याचा भाव ८ हजार शेवट करील,काद्याचा भाव उच्चाक करीन, दिवाळीचा दिवा कुठे कुठे लागेल. गहु आणि हरबरा जोडीन पेरावा तर पुढिल वर्षाचे भाकीता मध्ये ज्वारीचा भाव ६ हजार राहिल ,पेर दुबार होईल,गल्ली ते दिल्ली धुमाकुल माजेल,माय पित्याला सांभाळा तर गर्वाचे हारण होईल असे चालु व पुढिल वर्षाचे होईल. व्हईल (भाकीत)महाराजानी सागितले या यात्रो उस्तवासाठी विरभद तरण मंडळांनी विशेष परीक्षम घेतले कार्याक्रमासाठी तालुक्यातील भाविक भक्ता मोठ्या संखेने उपस्तीत होते.



