वरळी (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत उभी फूट पडून अजित पवार गटाने सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही आणीबाणीची झाली असून त्यातच काल मनसेचे नेते अभिजीत पानसे व ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा झालीची बातमी हे वृत्तवाहिनीवर झळकायला सुरुवात झाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरण उद्याला येते की काय असे वाटू लागले.
राजकीय विरोध बाजूला ठेवून पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची केले औक्षण
म्हणजे ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे व मनसेचे नेते राज ठाकरे हे आता ठाकरे बंधुनी एकत्र यावे असं आवाहन करणारे बॅनर्स वेगवेगळ्या शहरात लागले आहेत. तर दुसरीकडे मुंडे भाऊ-बहिण यांच्यातील कटुताही कमी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
भाजपासोबत आलेल्या राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी वरळीतील निवासस्थानी जात बहीण पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडे या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. मागील काही महिन्यांपासून त्या भाजपात नाराज असल्याच्याही चर्चा अधूनमधून येत राहतात. त्यात आता भाऊ धनंजय मुंडे यांना मंत्री बनवल्यानंतर पंकजा मुंडे काय निर्णय घेणार असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात होता. पण तूर्तास या दोन भाऊ बहिणींमध्ये प्रेमाचे नाते पाहायला मिळाले.
वरळीतील निवासस्थानी मंत्री धनंजय मुंडे आल्यानंतर बहिण पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर भावाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबद्दल धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटलं की, राज्याच्या मंत्री पदी नियुक्तीनंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बीडवासियांची दोन्ही बहिण भाऊ हे एकत्र यावे. असे अनेक जणांच्या मुखी या गोष्टीची चर्चा असून यामुळे पुढील काळामध्ये धनंजय मुंडे व पंकजा मुंडे ह्या भाऊ बहिणीची जोडी मजबूतपणे उभी राहील अशी आपण उपेक्षा करायला हरकत नाही




