spot_img
spot_img

*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन* *राज्यपाल व पालकमंत्र्यांनी केले स्वागत*

शिर्डी, दि. ७ ( जनता आवाज वृत्तसेवा) :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. 
  
 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर विमानाने आगमन झाल्यानंतर राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग,
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही राष्ट्रपतींचे स्वागत केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!