या बाबत सविस्तर वृत्त असे की बाभळेश्वर बु येथील,तक्रारदार यांनी सन २०१७ बाभळेश्वर बुद्रुक, ता. राहाता,जि. अहमदनगर येथील गट क्र व उप विभाग ६५ मध्ये १ हेक्टर ५२ आर शेती क्षेत्र विकत घेतले होते, सदर क्षेत्राची तक्रारदार यांनी खाजगी मोजणी केली असता ३२ आर क्षेत्र कमी भरल्याने न्यायालयात याच्या रिपोर्ट ची मागणी केली असता तक्रारदार यांनी वेळोवेळी भूमिअभिलेख कार्यालय राहाता येथे जाऊन यातील आलोसे दुशिंग यांना नकाशा व रिपोर्ट तयार करून मा. न्यायालायत लवकर सादर करा या बाबत विनंती केली होती,
राहाता येथील भूमी अभिलेखपाल विकास दुशिंग याला पंचवीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले
राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-
राहाता येथिल भूमी अभिलेखपाल विकास दुशिंग याने जमिनीचा नकाशा देण्यासाठी तक्रारदारास पंचवीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला गेल्याने राहात्यासह परिसरात खळबळ उडाली आसुन भुमी अभिलेख कार्यालयातील या निंदनीय प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे या आधिकार्यांवर कोणाचा धाकच शिल्लक राहिला नसल्याचे या प्रकाराने निष्पन्न झाले आहे
दिनांक २०/०६/२०२३ रोजी यातील दुशिंग यांनी नकाशा व रिपोर्ट तयार केला होता परंतु कोर्टात पाठविला नव्हता, म्हणून यातील तक्रारदार यांनी दिनांक ०२/०७/२०२३ रोजी यातील दुशिंग यांना भेटून नकाशा व रिपोर्ट मा. न्यायालयात पाठविण्याची विनंती केली असता दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या बाजूने नकाशा व रिपोर्ट मा. न्यायालयात सादर करण्यासाठी पंचवीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती व त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालय,राहाता येथे लाचलुचपत विभागाच्या वतिने सापळा सापळा रचुन दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष पंचवीस हजाराची लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडले.
विकास दुशिंग विरुद्ध राहता पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता या कर्मचाऱ्यांना शासकिय वेतन असतांना देखिल लाच मागण्याची वेळ येते हे दुर्दैवी आसुन या विभागातील कर्मचाऱ्यांच्ये मासिक कामाचे आवलोकन होने गरजेचे आहे
प्रसाद मोमले वाकडी.




