लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा १६ वा वर्धापन दिन गुरुवार दि. ६ जुलै २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी डॉ.यशराज खर्डे व ऋषिकेती चोरमुंगे हे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्या डॉ. रोजमिन बेलिन यांनी केले.
डॉ यशराज खर्डे आपल्या भाषणातून प्रवरा परिसरातील शैक्षणिक संकुलाबद्दल आपला अनुभव सांगितला.तसेच प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल मधील माजी विद्यार्थिनीनी ऋषिकेती चोरमुंगे हिने शिक्षणाचे महत्त्व व शिस्तीचे महत्व पटवून सांगितले. आम्ही या प्रवरा परिवारात कसे घडत गेलो हे सांगितले या प्रसंगी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन प्राचार्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
१६ व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शाळेत विविध कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले होते. मनोरंजनात्मक खेळ उपस्थितांसाठी आकर्षण ठरले. रस्सीखेच खेळ खेळले गेले. कार्यक्रम संपल्यावर सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
कुमारी श्रीजिता चौधरी हिने आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.




