लोणी दि.३१( जनता आवाज वृत्तसेवा ):-मेरी माटी मेरा देश कार्यक्रमांतर्गत अमृत कलश संकलन समारोप कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील दहा मुलींची निवड झाली असून स्वयंसेवकांचा चमू अमृतकलश घेऊन दिल्लीला समारोप कार्यक्रमासाठी रवाना झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली
नवी दिल्ली येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रमांतर्गत अमृत कलश संकलन समारोप कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे आयोजित होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.महावीर सिंग चौहान कृषी शिक्षण संचालिका डॉ.शुभांगी साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा अमृत कलश तयार करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने एकूण तीस स्वयंसेवकांची निवड केली गेली त्यात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील दहा विद्यार्थिनी स्वयंसेविकांची निवड करण्यात आलेली आहे.तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या चमूचे व्यवस्थापन करण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी
डॉ.प्रविण गायकर यांची निवड झाली. डॉ.गायकर हे विद्यापीठाचा चमू घेऊन दिल्ली येथे रवाना झाले. यामध्ये अदिती कोरडे, ज्ञानदा माणेराव, गायत्री साळवे, ऋतुजा ढगे, सानिका उगले, आटोळे दिव्या, स्वप्नाली हारदे, अदिती पाटेकर, साक्षी निकम, सांची सदावर्ते या दहा विद्यार्थिनीं स्वयंसेवकांची निवड झाली आहे.
सदर अमृतकलशातील माती कर्तव्य पथावर अमृतवाटिकेच्या निर्माणात वापरली जाणार आहे..
सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ सहसचिव भारत घोगरे अतांत्रिकीचे संचालक डॉ.प्रदीप दिघे, कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील संस्थेच्या सर्वच शाळा,माध्यमिक विद्यालये,कनिष्ठ महाविद्यालय,उच्च महाविद्यालये,तांञिक अतांञिक शाखामधील विद्यार्थ्यानी मेरी माटी मेरा देश कार्यक्रमांतर्गत अमृत कलश संकलन मोहीम राबविण्यात आली यासाठी विशेष रथ तयार करुन गावोगावी जनजागृती करण्यात आली.



