spot_img
spot_img

मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा – आज श्रीगोंदा तालुका बंद ची हाक

श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ):-आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळाले पाहिजे यासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर पुन्हा आमरण उपोषणास सुरवात केलेली आहे.प्राणांतिक उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज श्रीगोंदा तालुका बंद ची हाक देण्यात आली आहे.

अहमदनगर -दौंड मार्गांवर काष्टी ( ता. श्रीगोंदा ) येथे रस्ता रोको करणार असल्याचे तहसीलदार पंकज नेवसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यासंदर्भात आज सोमवार दि ३० रोजी सकल मराठा समाजाची संत श्री संत महंमद महाराज यांच्या मंदिरात पार पडलेल्या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!