अहमदनगर( जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगर मध्ये बऱ्याच दिवसापासून हत्या, मुलींची छेडछाड, अवैध धंदे, असे अनेक प्रकारचे घटना या अहमदनगर मध्ये घडत आहे. असाच एक प्रकार पुन्हा अहमदनगर येथे घडला आहे. पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी बोल्हेगाव उपनगरात घडली. यश कृष्णादास पाटील (वय 21 रा. नागापूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोल्हेगाव उपनगरात पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार हत्याराने वार करून जखमी
उपचारादरम्यान त्यांनी मंगळवारी (दि. 4) तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून योगेश सखाराम गायकवाड (रा. मोरया पार्क, जुनी पोलीस कॉलनी, बोल्हेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सखाराम गायकवाड हा यश पाटील यांच्याकडे खानावळी म्हणून होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याची खानावळी व घरी येणे-जाणे बंद केल्याने त्याचे व पाटील कुटुंबाचे वाद झाले होते. या वादाची फिर्याद यश यांच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.
सोमवारी सायंकाळी योगेश गायकवाड याने फिर्यादीच्या घरी येऊन त्यांच्या आईला शिवीगाळ केले. त्यानंतर फिर्यादी, त्यांची आई, बहिण व काका त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने धारदार हत्याराने फिर्यादी व त्यांचे काका अनिल काळे यांच्यावर हल्ला केला. फिर्यादीच्या आईला मारहाण केली. हल्ल्यात फिर्यादी यांना जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गेल्या बऱ्याच दिवसापासून अहमदनगर शहर व आसपास असलेल्या खेडेगावात ( केडगाव ) येथे गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. प्रामुख्याने यामध्ये तरुण वर्गाचा समावेश आहे. त्यामुळे अहमदनगर शहर व ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन हे सतर्क नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीला आळा बसत नाही. हे प्रामुख्याने निदर्शनात आले आहे.




