spot_img
spot_img

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे राहुरी येथे साखळी उपोषण सुरू

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ): – राहुरी येथे मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली आहे. शेकडो तरुणांनी एकत्रित येत राहुरी शहरात दुखचाकी रॅली काढत तहसील कार्यलया समोर साखळी उपोषणास सुरवात केली आहे.

साखळी उपोषण सुरवात करण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हर घालून सुरवात करण्यात आली.

या प्रसंगी मराठा बहुुउद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचे सदस्य देवेंद्र लांबे यांनी प्रस्ताविक करतांना म्हंटले की,गेल्या चाळीस वर्षान पासून मराठा आरक्षणाचा लढा आज पर्यंत अविरत चालू आहे.मराठा आरक्षण लढया मध्ये पाहिले बलिदान हे कै.अण्णासाहेब पाटील यांनी दिले,त्यांनंतर अ.भा.छावा संघटनेचे कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षण जनजागृती करत असतांना आपला देह त्यागला अशा प्रकारे आता पर्यंत पन्नास पेक्षा तरुणांनी आरक्षणा मिळावे म्हणून आपला देह त्यागला आहे.सरकारने वेळीच मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे असे लांबे म्हणाले.

या प्रसंगी राजेंद्र शेटे म्हणाले की मराठा आरक्षण लढ्या मध्ये मनोज जरांगे पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे.जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी मोठ्याप्रमाणावर मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे.वेळीच सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे व मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवावे असे शेटे म्हणाले.

या प्रसंगी सत्यवान पवार म्हणाले की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास त्रास झाल्यास संबंध महाराष्ट्रात उद्रेक होईल.सरकारने तात्काळ निर्णय जाहीर करावा.

या प्रसंगी वंचितचे नेते बाळासाहेब जाधव यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेत सदावर्ते यांचा निषेध नोंदवीला.

अनिल जाधव यांनी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचा जाहीर निषेध करत मराठा आरक्षणाला वंचित पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.

या प्रसंगी संतोष चोळके ,पत्रकार संघाच्या वतीने राजेंद्र वाडेकर, सुधीर तनपुरे,ओबीसी नेते अशोक तुपे,निलेश जगधने,गंगाधर काकडे,शिलेगावचे सरपंच अर्जुन म्हसे,कुक्कडवेढे सरपंच दिपक मकासरे, सारिकाताई गागरे यांनी मनोगत व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!