नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):-मराठा समाजाचे साखळी उपोषणास शनिवार पासून नेवासा शहरात सुरूवात झाली आहे . माजी मंत्री आ शंकरराव गडाख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला . विविध समाजाने या आंदोलनात सहभागी होऊन मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे.
दिनांक २५ ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी व शासनाने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा यासाठी नेवासा येथील गणपती चौकात शनी दिनांक 28 पासून साखळी पद्धतीने उपोषणास बसलेले आहेत . या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील काही युवकांनी मुंडन केले .
यावेळी आ गडाख म्हणाले कि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे यासाठी इतर सर्व समाजाने पाठिंबा दिला आहे . सरकारने यासाठी जे जे पाहिजे ते केले पाहिजे . विशेष अधिवेशन बोलावून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे . दुसऱ्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे व तातडीने आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी आ शंकरराव गडाख यांनी याप्रसंगी केली राज्यभरात गावा गावतील मराठा बांधव आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत.
आंदोनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झालेली आहे शासनाने आंदोलकांचा अंत न पाहता तातडीने आरक्षण द्यावे यासाठी नेवासा तालुक्यातील मराठा आंदोलक राज्यसरकार विरोधात आक्रमक झालेले आहेत
तालुक्यातील गावा गावात मराठा आरक्षणाविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांच्या प्रतिमांचे दहन आंदोलकांनी केले आहे. शासनाविरोधात आंदोलकात तीव्र असंतोष दिसून येत आहे



