spot_img
spot_img

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींचे विभागीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

लोणी दि.३१( जनता आवाज वृत्तसेवा ):-पुणे येथे विभागीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज लोणीच्या मुलींनी १९ वर्षे ४×१०० मिडले रिले जलतरण क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

१९ वर्षे वयोगटात कुमारी ईश्वरी वडघने हिने ५० मीटर बॅक स्ट्रोक जलतरण क्रीडा प्रकारात स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी सहा विद्यार्थिनींची निवड झाली आहे. तसेच कु. भाग्यश्री मार्कंडे हिने २००मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तृतीय क्रमांक संपादित केला आहे. या सर्व खेळाडूंना स्विमिंग कोच प्रा. सुचित्रा तांबे आणि प्राचार्य रेखा रत्नपारखी यांचेमार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ सहसचिव भारत घोगरे अतांत्रिकीचे संचालक डॉ.प्रदीप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!