लोणी दि.३१( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्माभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात क्लिनिकल संशोधन , क्लिनिकल डेटा व्यवस्थापन व फार्माकोव्हिजिलन्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
महाविद्यालय आणि डेसमेक क्लिनिकल सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे या मध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा एकदिवसीय कार्यशाळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेसाठी सौ. नेहा शर्मा , संचालक डेसमेक क्लिनिकल सर्विसेस, डॉ. अर्चना सूर्यवंशी आणि पदमेश कुलकर्णी हे सर्व प्रशिक्षक म्हणून लाभले होते. सौं नेहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, विविध क्लिनिकल संशोधन संस्था , क्लिनिकल डेटा व्यवस्थापन व फार्माकोव्हिजिलन्स या क्षेत्रात विद्यार्थांना कशाप्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. डॉ. अर्चना सुर्यवंशी यांनी या क्षेत्रातील काही बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.तर पदमेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील विविध मुलाखती तंत्रज्ञान, बौद्धिक व योग्यता चाचणी साठी कशी तयारी करावी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा भविष्यात फार्माकोविगीलन्स,औषध नियामक व्यवहार, क्लीनिकल संशोधन क्लिनकल डेटा व्यवस्थापन अश्या विविध विभागात नोकरीसाठी होणार आहे.महाविद्यालयात स्वतंत्र ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या विभागंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबर नोकरीं व व्यवसायात उपयुक्त गोष्टींवरती विविध उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात येतात.या एक दिवसीय कार्यशाळे मध्ये एकूण १५४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रैनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ . सोमेश्वर मनकर ,आणि प्रा. राजश्री घोगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. मनकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राजश्री घोगरे यांनी केले.



