लोणी दि.३१( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय च्या गृहविज्ञान विभाग च्या दुसऱ्या वर्ष्याच्या ऐश्वर्या गुलाटी हिची राष्ट्रीय छात्र सेनेच्या राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्प मध्ये निवड झाली आहे. हा कॅम्प १५ तो २२ नोव्हे २०२३ दरम्यान राज्यस्थान येथे होणार आहे अशी माहिती महाविद्यालया च्या प्राचार्या डॉ अनुश्री खैरे यांनी दिली.
महाविद्यालयात मागील वर्षी पासून एफ.एस. एफ.एस. स्वरूपाचे एन. सी सी चे युनिट सुरु करण्यात आले आहे महाविद्यालयाचे ए.एन. ओ म्हणून प्रा अंजु पठाडे काम पाहत आहे तिच्या निवडी बद्दल सर्वानी तिचे अभिनंदन केले आहे.



