लोणी दि.५ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील संजय अशोक अकोलकर या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन मार्फत होणाऱ्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असल्याची माहिती कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी दिली.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी कृषी महाविद्यालय, लोणी विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवार फेरी, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी, कार्यानुभव उपक्रम, शेतकरी मेळावे इ. उपक्रमाचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांच्याया यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा
सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के पाटील,सहसचिव भारत घोगरे, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




