spot_img
spot_img

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी टाकळीभान येथे साखळी उपोषणात महिलांचे उपोषण सुरू

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठींबा देण्या करीता सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थ यांचे वतीने येथील तलाठी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरू करण्यात आलेले असून मराठी समाजास आरक्षण मिळण्यासाठी आता महिला आक्रमक झाल्या असून साखळी उपोषणात महिलांनीही साखळी उपोषण सुरू केले आहे. 

मराठा आरक्षणा बाबत शासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याने आरक्षण मिळावे म्हणून आक्रमक झालेल्या महिलांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे.

दिपाली खंडागळे, लता पटारे, कल्पना मगर, कविता रणनवरे या चार ग्रामपंचायत सदस्या महिलांनी आरक्षण मिळण्यासाठी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!