spot_img
spot_img

रविवारी कर्मवीर शंकररावजी काळे यांचे ११ वे पुण्यस्मरण                                                       

कोळपेवाडी( जनता आवाज वृत्तसेवा ):- शिक्षण,सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या ११ व्या पुण्यस्मरण निमित्त रविवार (दि.०५) रोजी सकाळी ९.०० वाजता पुष्पांजली कार्यक्रम व सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (चिखलीकर) यांचा जाहीर हरी किर्तनाचा कार्यक्रम कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे होणार आहे. अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे.

सालाबाद प्रमाणे याहिवर्षी स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या ११ व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समुह व काळे परिवारावर प्रेम करणा-या हितचिंतक, कोपरगाव मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांनी तसेच रयत परिवाराने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!