लोणी दि.५ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-देशभरातील नामवंत फार्मसी महाविद्यालयांमध्ये एम. फार्मसी या पदव्युतर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत २०२२-२३ या वर्षी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेमध्ये लोणी येथील लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, लोणी येथील नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली
महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विध्यार्थी आदित्य पंधारे ( AIR 110), श्रीराम बांगर (AIR 274), चेतन ताठे (AIR 297), आदित्य ह्यालीज (AIR 1936), संकेत गाडेकर (AIR 2999), धनश्री भगत (AIR 3447), प्रतिक माळवदे ( AIR 4620), शैरिश शेख (AIR 4724), स्तुती निंबाळकर (AIR 12450) या नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादान केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचि संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव श्री भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ,संचालक डॉ. बी. एम. पाटील यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय भवर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.




