लोणी दि.१( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट मध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा शुभम मुसमाडे यांनी राष्ट्रीय एकात्मता दिवसाचे महत्व विशद करत प्रस्ताविक केली.
संस्थेचे प्राचार्य डॉ अनिल बेंद्रे यांनी राष्ट्रीय एकात्मता देशाला बळकटी देते असे प्रतिपादन केले. यावेळी सामूहिकपणे राष्ट्रीय एकात्मतेची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. शपथ पत्रिकेचे वाचन ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विद्यार्थी सर्वज्ञ निमसे यांनी केले. याप्रसंगी प्रा संतोष वर्पे, प्रा राहुल विखे, प्रा. सत्यन खर्डे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमाबद्दल संस्थेच्या संचालिका डॉ शुभांगी साळुंखे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. आभार प्रा राहुल विखे यांनी मानले.



