spot_img
spot_img

प्रथमच लोणी व प्रवरा परिसरातील मराठा समाजातील विद्यार्थी व गृहिणीसाठी विनामूल्य कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स मराठा समाजातील युवक युवतींनी मोठी संधी

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था( सारथी ) पुणे आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित ( एमकेसीएल) पुणे यांच्या विद्यमाने मराठा समाजातील युवक- युवतीसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल विकास प्रशिक्षण लोणी शहरातील हायटेक कॉम्प्युटर सेंटर ( लोणी ) या संस्थेमध्ये देण्यात येत असून युवक -युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान हायटेक कॉम्प्युटर लोणी कडून करण्यात आले आहे.

मराठा व कुणबी मराठा समाजातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तसे कमीत कमी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मराठा समाजासाठी सारथीकडून कडून सुरू करण्यात आलेल्या मोफत व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लोणी व प्रवरा परिसरातील तरुणांनी लाभ घ्यावा.

कोर्से पूर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या मार्फत जॉब अससिस्टन्स मिळणार आहे.

सदर कोर्सचा उपयोग मराठा युवक – युवती यांना करिअरमध्ये होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी संपर्क साधावा असे आव्हान प्रा. प्रवीण रकताटे, प्रा. अशोक घोलप यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!