नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहराला जोडणारे व शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा वारकऱ्यांना सोबत घेऊन टाळ मृदंग वाजवत बांधकाम विभाग कार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता श्री दुबाले यांना दिला.
बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी कामिका एकादशीचा उत्सव आहे यादिवशी सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये लाखो भाविक पैस खांबाचे दर्शन घेण्यासाठी येतात विशेषतः नेवासा तालुका व सबंध महाराष्ट्रातुन असंख्य दिंड्या नेवासा शहरामधे येतात परंतु नेवासा शहरामध्ये येणाऱ्या खडका फाटा ते नेवासा या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून हा रस्ता आहे की नाही अशी परिस्थिती आहे व नेवासा फाटा ते श्री ज्ञानेश्वर मंदिर या रस्त्यावर देखील खड्डे पडले असून अस्ताव्यस्त पसरलेले दुभाजकही अडचणीत भर घालणारे आहे यामुळे दर्शनास येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होऊन अपघात होण्याची शक्यता आहे तरी १० तारखेपर्यंत या रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवून भाविकांचा मार्ग सुकर करावा अन्यथा कामिका एकादशीच्या दिवशीच आपल्या कार्यालयावर टाळ मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांसह दिंडींने येऊन आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी व त्वरित कारवाई करण्यात यावी असा इशारा यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला,
निवेदन श्री पातकर यांनी स्वीकारले यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष राजेश कडु, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष गोरक्षनाथ बेहळे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष विवेक ननावरे युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रतिक शेजुळ, अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष रोहित पवार विलास बोरुडे, बाळासाहेब क्षिरसागर, श्रीकांत बर्वे, अशोक मारकळी, अजितसिंह नरुला आदी उपस्थित होते.
या प्रती पालकमंत्री, अहमदनगर
मा. जिल्हाधिकारी ,मा.अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मा. पोलिस अधीक्षक, मा. उप विभागीय अधिकारी, यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.



