टाकळीभान (जनता आवाज वृत्तसेवा):- अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ चा ६७ वा ऊस गळीत हंगामाचा टाकळीभान गटाचा ऊस तोडणी शुभारंभ अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय श्री. भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. मयुरदादा पटारे आणि संत सावताचे संचालक श्री. विलासभाऊ दाभाडे यांचे हस्ते टाकळीभान येथे पार पडला.
त्याप्रसंगी जेष्ठ नेते श्री. ज्ञानदेव साळुंके, जेष्ठ नेते श्री. बाबासाहेब अण्णा बनकर, जेष्ठ नेते श्री. शिवाजीमामा शिंदे, जेष्ठ नेते श्री .दत्तात्रयमामा नाईक, कारखान्याचे संचालक श्री. यशवंतअप्पा रणनवरे, लो.वि.आ चे उपाध्यक्ष श्री. रावसाहेबनाना वाघुले, श्री.तुकाराममामा बोडखे, ग्राम.पं सदस्य श्री.शिवाजीमामा पवार, चेअरमन श्री.बाबासाहेब (सर) लोखंडे, ग्राम .पं सदस्य श्री.सुनीलभाऊ बोडखे , युवा नेते श्री. सोमनाथभाऊ पाबळे, सेवा संस्थेचे माजी संचालक श्री.संजयअप्पा रणनवरे, श्री.महेशभाऊ लेलकर , श्री. राजेंद्रमामा कोबरणे, श्री. विक्रममामा मगर, श्री.सोमनाथमामा हुळहुळे, श्री.एकनाथ पटारे, श्री. मच्छिंद्र कोकणे, श्री. देविदासभाऊ बनकर, श्री. कचरूमामा गाढे, श्री. सागरभाऊ परदेशी आदी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.



