माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर वडाळा महादेव येथे भीमराज प्रतिष्ठान सामाजिक संघटना यांचे वडाळा महादेव येथे मराठा आरक्षणासाठी एक दिवशीय लाक्षानिक उपोषण करण्यात आले.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी मनोज जरांगे पाटील प्राणांतिक उपोषण करत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी भीमराज प्रतिष्ठाण सामाजिक संघटना वडाळा महादेव श्रीरामपूर यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. तसेच गीतांजली प्रफुल्ल पवार यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला त्यांचा कार्यकाळ हा आजून दोन वर्ष बाकी होता पण मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी आपल्या सदस्य पदाचा त्याग केला. तसेच मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांना वडाळा महादेव गावातील दलित समाज, मुस्लीम समाज, त्याचबरोबर माळी समाज धनगर समाज यांनी देखील पाठिंबा दर्शविला.
यावेळी सलीम भाई वाहेदमिया शेख,सुहास राठोड,सुजित राठोड,दीपक पगारे,बाळासाहेब राठोड,दीपक लोंढे,सोनू राठोड,सुरेश लोंढे ,दीपक राठोड,नितीन राठोड,सुनिल कुदळे,धनंजय पवार,रघुनाथ उघडे,रामभाऊ कासार,अरुण पवार,सुनील शंकर पवार,सचिन पवार,बापूसाहेब पवार,अविनाश पवार,सुरेश पवार,रामभाऊ कासार,अजित कासार,सर्जेराव कासारभारत पवार आदी समस्थ वडाळा महादेव ग्रामस्थ उपस्थित होते.



