राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ): – राहुरी येथे मराठा आरक्षण आंदोलाचा गुरुवारी चौथा दिवस होता.गुरुवारी वांबोरी,कात्रड, गुंजाळे, कुक्कडवेढे येथील ग्रामसथांच्या वतीने बाजार पेठ बंद ठेवत सहभाग नोंदवला.
या आंदोलना दरम्यान राहुरी येथे मराठा आरक्षण साखळी उपोषणा दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींची तिरडी बांधण्याचा कार्यक्रम वाजत गाजत साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मराठा बहुुउद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचे सदस्य देवेंद्र लांबे यांनी सांगितले की गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाजाला फसविण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून किंवा मराठा आरक्षण आंदोलनात विघ्न आणत आहेत अशा प्रवृत्तींची तिरडी आज सजवली आहे.मराठा आरक्षणाला विरोध करण्याचे तात्काळ थांबवावे अन्यथा आज तिरडी सजवली आहे,भविष्यात मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलाच तर सजवलेल्या तिरड्या मराठा समाजाला पेटवायला वेळ लागणार नाही याची नोंद घ्यावी अशी माहिती लांबे यांनी दिली.
प्रतिमात्मक तिरडी आंदोलन करण्यासाठी विनायक बाठे,मधुकर घाडगे,ज्ञानेश्वर सप्रे,रवींद्र तनपुरे,महेंद्र शेळके,बंटी पटारे आदींनी सहभाग नोंदवला.
गुरवार राहुरी येथील साखळी उपोषणास चर्मकार विकास संघ,राहुरी तालुका,वांबोरी कृषिउत्पन्न बाजार समिती व बाजार पेठ बंद ठेवत पाठिंबा दर्शवीला आहे.
सोमवार दि.३० ऑक्टो. पासून राहुरी येथे सुरु असलेल्या आंदोलनात राजूभाऊ शेटे,सत्यवान पवार, कैलास तनपुरे हे गेल्या ४ दिवसांपासून दिवस भर उपोषण करून साखळी उपोषणात सहभाग नोंदवत आहेत.



