लोणी दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील शनिवार दि.४नोव्हेंबर २०२३ रोजी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून नागरीकांच्या भेटीसाठी लोणी येथील जनसेवा कार्यालयात उपस्थित राहाणार असल्याची माहीती जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात आली.
मंत्री विखे पाटील शनिवारी सकाळी ११ वाजेपासून कार्यालायात थांबून जिल्ह्यातील नागरीक, पक्षनेते आणि कार्यकर्त्याच्या भेटी घेवून त्यांचे प्रश्न आणि शिष्टमंडळाचे निवेदन जनता दरबाराच्या माध्यमातून स्विकारणार आहेत.



