12.1 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

अजित पवार गटाकडून नाशिक मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचा ताबा

नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):-नाशिक येथे आज सकाळी राष्ट्रवादी मधील पडलेले दोन गट यातील एक अजित पवार गटाकडून नाशिक मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचा ताब्या घेण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कोणालाही घुसू देणार नाही अशी भूमिका अजित पवार गटाचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस दीलीप खैरे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक येथील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ही बैठक अजित पवार यांच्यासोबत न गेलेल्या विरोधी गटाने ठेवली होती. त्यामुळे अजित पवार गटाने त्या बैठकीआधीच पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. या ठिकाणी कोणतीही बैठक होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही गट समोरासमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याबरोबर नाशिक मधली सर्व राष्ट्रवादी आमदार यांच्याबरोबर असल्याचे दिसून आले आहे.
इतर जिल्ह्याच्या कार्यालयांकडे देखील अजित पवार गटाचे लक्ष नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर देखील अजित पवार यांचे लक्ष आहे. हे सर्व कार्यालय ताब्यात घेण्याची रणनिती अजित पवार यांच्या वतीने आखली जात आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाध्यक्षांना फोन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
 रविवारी शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसून आले. यानंतर मोठमोठ्या घडामोडी घडणार हे चित्र स्पष्ट झाले होते. कारण दुसरीकडे शरद पवारांनी कायदेशीर कारवाई धावणार नसल्याचे म्हणत असतानाच जयंत पाटील यांनी मात्र कारवाईची संकेत दिली. यामुळे महाराष्ट्र मध्ये मोठा राजकीय संघर्ष पहावयास मिळू शकतो.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!