टाकळीभान( जनता आवाज वृत्तसेवा ):- टाकळीभानचे भूमिपुत्र चि. सौरव उर्फ श्रीराम किशोरअप्पा मैड यांची पुणेरी पलटणशी संलग्न “युवा पलटण” या नामांकित कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयुर पटारे म्हणाले की टाकळीभान नगरी ही खेळाडूंची पंढरी असून येथील खेळाडू असलम इनामदार हा भारतीय कबड्डी संचाचे प्रतिनिधित्व करतो, तसेच येथील शिवम पटारे याची देखील हरयाणा स्टीलर्स या प्रो कबड्डीच्या संघात खेळणार आहे. श्रीराम हा अतिशय होतकरू तरुण असून त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांचे वडील किशोर मैड हे माजी उपसरपंच असून त्यांचा श्रीरामच्या यशात मोलाचा वाटा आहे असे सांगून त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री. ज्ञानदेवमामा साळुंके, कारेगाव भागचे संचालक श्री. शिवाजीमामा शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. बाबासाहेबअण्णा बनकर, माजी व्हाइस चेअरमन श्री. दत्तात्रयमामा नाईक, संत सावताचे संचालक श्री. विलासअण्णा दाभाडे, कारखान्याचे संचालक आणि सरपंच पती श्री. यशवंतअप्पा रणनवरे, लो.वि.आ चे उपाध्यक्ष श्री. रावसाहेबनाना वाघुले, श्री. शंकरमामा कोकणे, माजी उपसरपंच श्री. किशोरअप्पा मैड, श्री. बाळासाहेबमामा आहेर, श्री. तुकाराममामा बोडखे, श्री. शिवाजीतात्या पटारे, श्री. गोटराममामा दाभाडे, शाखा व्यवस्थापक श्री. दिनकर पवार साहेब, व्यापारी श्री. सुभाषभाऊ ब्राम्हणे, श्री. एकनाथभाऊ पटारे, श्री. भाऊसाहेब पवार, श्री. संदीपभाऊ बनकर, श्री. निलेश कोबरणे, श्री. वैभव रणनवरे आदी उपस्थित होते.



