spot_img
spot_img

शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार – उत्कर्षा रुपवते 

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना जनतेने संधी देऊनही कामाबाबत मात्र उदासीनता जाणवत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचा दावा इंदिरा काँग्रेसच्या प्रदेश महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी केला  दादासाहेब रूपवते यांचे योगदान सर्वश्रुत आहे.

नेवासा येथे हॉटेल प्रणाम येथे पत्रकारांशी उत्कर्षा रूपवते बोलत होत्या यावेळी इंदिरा काँग्रेसचे रंजन जाधव ,रमेश जाधव उपस्थित होते

उत्कर्षा रूपवते पुढे म्हणाल्या की शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्याने कामाचे संधी असताना उदासीनता आढळून येत आहे मतदारसंघ राखीव झाल्यावर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामावर जनता समाधानी नसल्याचे चित्र मतदार संघात फिरत असताना दिसून येत आहे श्रीक्षेत्र अकोले ते श्रीक्षेत्र नेवासा, शिर्डी आशा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्राचा समावेश असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात भौगोलिक सौंदर्य असताना पर्यटनाच्या दृष्टीने काम झालेले नाही ते विकासाचे काम झाले असते तर अनेक प्रश्न सुटलेले दिसले असते.मतदारसंघाबरोबर परिसराचा विकास झाला असता बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते.

सध्याचे राजकारण दिशाहीन होत असून शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे शेतमालास भाव नाही शेतीपूरक जोडधंदे नाहीत त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे समन्यायी पाणी वाटप कायद्यात लक्ष घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी समन्वयाची भूमिका ठेवून हा प्रश्न हाताळणे आवश्यक आहे

शिर्डी मतदारसंघ हा राखीव झाल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याची संधी मिळाली होतीमात्र त्यांनी त्या संधीचे सोनं न केल्याने एक सक्षम पर्याय म्हणून मी पक्षाकडे निवडणूक साठी आग्रह धान्य असून उमेदवारी करणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!