spot_img
spot_img

प्रवरा पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचे ५८ वे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाले.यावेळी पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम ही अतिशय आनंदात पार पडला. स्नेहसंमेलनाची सुरुवात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने व दिपप्रज्वलनाने झाली. स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व आय पी एस अधिकारी सन्माननीय श्री.सागरजी खर्डे पाटील हे उपस्थित होते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विश्वस्त व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांची ही विशेष उपस्थिती होती.प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी केले. 

शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा व उपस्थित इतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम “गडकिल्ल्यांच्या देशा,माझ्या महाराष्ट्र देशा” ही होती. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील वार्षिक अहवालाचे वाचन व शाळेने राबवलेले विविध उपक्रम व विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश याचे इतिवृत्त शाळेचे प्राचार्य डॉ.बी बी अंबाडे यांनी यावेळी सविस्तरपणे सांगितले.

वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे श्री. सागरजी खर्डे पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे व स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे महत्त्व विशद केले. या स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. तर सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व व आजच्या विद्यार्थ्यांपुढील असणारी आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले.यश मिळवायचे असेल तर जिद्द व चिकाटी अंगी बाळगावी, असा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.यामध्ये इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंतांना तसेच इतर इयत्तेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील आदर्श विद्यार्थी पुरस्कार हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी महेंद्र पाडवी व आदर्श विद्यार्थिनी कु.अक्षरा गडाख यांना मिळाला.तसेच वस्तीगृहातील आदर्श विद्यार्थी म्हणून नेताजी सदन-प्रतिक पावटेकर, शिवाजी सदन- आशिष वसावे,सरदार पटेल सदन-प्रतिक वसावे, तानाजी सदन-गांधले सिद्धांत व प्राथमिक विभागातील देशमुख श्रेयश या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते आदर्श विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..शैक्षणिक वर्ष २०२३ मधील शैक्षणिक वार्षिक करंडक सरदार पटेल या सदनाने पटकावला व अतिशय बहुमानाचा समजला जाणारा कॉक हाऊस कप ही सरदार पटेल या सदनानेच पटकावून दुहेरी यश संपादन केले.

मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी बहरदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे दिमाखात प्रदर्शन केले. शेवटच्या राजं आलं जिंकूनिया या गाण्यात प्रति शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष अश्वरूढ होऊन आल्यामुळे प्रवरा पब्लिक स्कूलचे संपूर्ण वातावरण भारावून गेले.सर्व पालकांनी व नातेवाईकांनी आपल्या पाल्यांच्या कलागुणांचा व नृत्याविष्काराचा आनंद लुटला,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमास भरभरून दाद दिली.वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची सांगता सामुहिक राष्ट्रगीताने झाली

याप्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे,संस्थेचे सहसचिव श्री.भारत पाटील घोगरे,संचालक श्री. दादासाहेब घोगरे,शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे व श्री.नंदकुमार दळे,श्री. अण्णासाहेब तांबे व संस्थेच्या इतर शाखांचे पदाधिकारी ही उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे,उपप्राचार्य श्री.के.टी अडसूळ,पर्यवेक्षिका सौ.एम एस जगधने, सौ.शुभांगी रत्नपारखी व कार्यक्रमाचे समन्वयक श्री.जी एफ मणियार हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे उपप्राचार्य श्री.के.टी अडसूळ यांनी आभार प्रदर्शन केले. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सौ.एन.व्ही पाटील यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!