श्रीरामपूर ( जनता आवाज
वृत्तसेवा ):- हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचे जिल्हा बँकेचे संचालक मा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की वसंतराव नाईक हाडाचे प्रगतिशील शेतकरी होते त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. शेती बरोबरच त्यांनी शिक्षण व औद्योगिक क्षेत्रातही लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक हे प्रख्यात कृषी तज्ञ, प्रगतिशील शेतकरी,राजनीति तज्ञ होते. या प्रसंगी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, मा. नगरसेवक रमेशशेठ कोठारी, के सी शेळके, पत्रकार बाळासाहेब भांड, रवी भागवत, श्री मुन्तोडे, सरवरअली मास्टर, अशोकराव जगधने, रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे, डॉ राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, नजीरभाई टेम्पोवाले, सनी मंडलिक, योगेश गायकवाड, गणेश काते,संजय शहा, श्री जमादार, राजेश जोंधळे, सागर दुपाटी आदी मान्यवर उपस्थित होते.




